जय भवानी निवासी अपंग मतिमंद विद्यालय, पलूस ही संस्था सन २०१४ मध्ये स्थापन झाली असून तिला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण विभाग व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सांगली यांची मान्यता आहे. ही शाळा अनुदान तत्वावर कार्यरत असून तिचे उद्दिष्ट बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांना स्वावलंबी, आत्मविश्वासी आणि समाजाभिमुख बनवणे आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यांना विविध व्यावसायिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.
शाळेत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, समाजाशी संवाद साधण्याची सवय लावणे आणि पालकांचा सहभाग वाढवून घरगुती पातळीवर पूरक वातावरण तयार करणे यावर भर दिला जातो. अशा प्रकारे ही विद्यालय विशेष गरज असलेल्या व्यक्तींसाठी आत्मनिर्भरता आणि सन्मानाचे जीवन जगण्याचे माध्यम ठरते. दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून त्यांना व्यवसायिक कौशल्य शिकवली जातात जेणेकरून आई-वडिलांच्या नंतर स्वतःचा उदरनिर्वाह करून छोटासा व्यवसाय करू शकतील एवढे शिक्षण दिले जाते.